शबरी घरकुल योजने अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी पुणे जिल्ह्यातील अमदाबाद येथे अतिउत्कृष्ट दर्जाची पक्की ३० घरे बांधून देण्यात आल्याबद्दल रेल्फोर फाऊंडेशन या संस्थेचा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते महाआवास योजना पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
रेल्फोर फाउंडेशन द्वारे सासवड, शिरूर, खेड, बारामती व जालना जिल्ह्यात ३ कोटी खर्च करून तलाव खोलीकरणाची कामे करण्यात आली असून आत्तापर्यंत १०० पक्की घरे आदिवासी बांधवांसाठी बांधून देण्यात आली आहेत, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या ह्या कामाचे कौतुक करत त्यांच्या ह्या सामाजिक कामगिरीसाठी शुभेच्छा देऊन मदतीचे आश्वासन दिले.फाऊंडेशनचे दिपक नाथानी व त्यांच्या सहका-यांनी या पुरस्कराचा स्विकार केला.