महानगर टेलिफोन निगम’ला (एमटीएनएल) आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करून ही कंपनी अंबानी यांच्या ‘जिओ’ला विकण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. ‘जिओ’ला कर्मचारी नको आहेत पण कोटय़वधींची ‘एमटीएनएल’ची मालमत्ता हवी आहे. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना मान्यताप्राप्त युनियनचे अध्यक्ष व खासदार अरविंद सावंत यांची साथ आहे, असा गंभीर आरोप ‘युनायटेड फोरम ऑफ युनियन्स आणि असोसिएशन्स’चे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांनी
केला.