विद्यार्थ्यांने ठरविले तर कोणतेही क्षेत्र अवघड नसते. फक्त त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असावी लागते. मुलींना तिनही सैन्य दलात खूप संधी उपलब्ध आहेत. सोहम अभ्यासिकेतून यापूर्वी १५ ते १६ अधिकारी प्रशासकीय सेवेत निवडले गेले आहेत. लवकरच मिलिटरी सर्व्हिसेसमधील संधी याबाबत मार्गदर्शन व पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध होणार आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ नेरकर यांनी सांगितले.
आदिती कटारे हिची देशभरातून वायूसेनेत नुकतीच गुणवत्तेवर निवड झाली. त्या निमित्ताने सोहम सार्वजनिक ग्रंथालयात सौ. सुजाताताई पलांडे विद्यमान नगरसेविका (संत तुकाराम नगर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आदितीचे शालेय शिक्षण कमल नयन बजाज येथे झाले, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची पदवी तिने जून २०१९ मध्ये ८०% गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिला लेप्ठनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
संत तुकारामनगरमधील एकमेव असलेली सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका अत्यंत मार्गदर्शक व महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या अभ्यासिकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. व यापुढेही असेच देशाच्या प्रशासनातील तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी घडावेत असे यावेळी स्थानिक नगरसेविका सौ. सुजाताताई पलांडे यांनी आदितीला शुभेच्छा देताना त्यांचे मत व्यक्त केले. सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेकडून आदितिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी किरणा सुवर्णा व्यापारी संघ अध्यक्ष मा. कल्याण कटारे, सौ. मंजुषा कटारे, आदितीचे आई वडील, श्री. सुरेश पवार केंद्र संचालक, सौ. वर्षा बोरसे, ग्रंथपाल सौ. निर्मला नेरकर, सुमन नेरकर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ नेरकर यांनी केले व सूत्रसंचलन श्री. प्रदीप बोरसे यांनी सौ. वर्षा बोरसे यांनी आभार मानले.