काळेवाडी येथील आझाद मित्र मंडळ स्पोर्टस क्लबच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळात मागील आठ दिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न झाले.
मंडळाचे अध्यक्ष पै काळुराम नढे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेवाडीमध्ये १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत सीसीटिव्ही लोकार्पण सोहळा,भव्य रक्तदान शिबिर,ओपन लायब्ररी लोकार्पण सोहळा, डेंग्यू व कोरोना मुक्ती अभियान,गुणवंत विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम ,प्लास्टीक मुक्त परिसर अभियान,कोविड योध्दा सन्मान,जागर स्त्री शक्तीचा असे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले.
उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी मावळ तालुक्यातील सहारा वृध्दाश्रमास दोन हजार रूपयांची मदत मंडळाच्या वतीने देण्यात आली. प्रसिद्ध प्रवचनकार शारदाताई मुंडे यांनी या रकमेचा स्विकार केला.
मंडळाचे संस्थापक विनोद तापकीर( स्विकृत नगरसेवक),अतुल नढे, खंडू आव्हाड यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला.