अनाथ व निराधारांसाठी आंदर मावळातील कुसवली येथे उभारण्यात आलेल्या सहारा वृध्दाश्रमाचे उदघाटन व ध्वजारोहण आमदार सुनिल शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
मावळ पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, कामशेत पोलिस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक आकाश पवार, कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते, प्रबोधनकार शारदाताई मुंढे,आरपीआयचे मावळ तालुका उपाध्यक्ष पांडुरंग बनसोडे, आरपीआय कामशेत शहर उपाध्यक्ष रूपेश गायकवाड , अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे अध्यक्ष राजरत्न शिलवंत, राष्ट्रवादी काॅग्रेसचे पिंपरी चिंचवड सरचिटणीस अशोक मगर, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय संस्था बोपोडी पुणे येथील सुनितादिदी, सुनिलभाई ,संविधान दिन सोहळा समितीचे विष्णु मांजरे, लक्ष्मण मुदळे, आंदर मावळमधील श्रीकांत टकले, राकेश साठे, भरत लष्करी,विश्वनाथ लष्करी
बळीराम वाडेकर(ग्रा प सदस्य वाहनगाव)
सिद्धार्थ भालेराव (ग्रा प सदस्य कुसवली)मंगेश चिमटे ( पो पाटील कुसवली)अमोल चिमटे ,सुरेश भालेराव,शिवाजी कशाळे,गौतम भालेराव,माधुरी खांडभोर (अंगणवाडी सेविका),शिता चिमटे,सविता भालेराव,सुभद्रा भालेराव
सुनीता भालेराव , वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी वृध्दांसाठी आणलेले टाॅवेल तसेच दैनंदिन वापरायच्या वस्तूंचे किट ,पांडुरंग बनसोडे यांनी २० ब्लॅकेट , महेंद्र बनसोडे ( दोन इलेक्ट्रीक गिझर), कामशेत येथील अशोक केदारी यांनी पाच हजार रूपयांचा धनादेश , कामशेत येथील महावितरणचे कर्मचारी आण्णा मानकर यांनी टूल किट साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख ब्राम्हणे यांनी तृप्ती जगताप यांनी आभार मानले.