येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालयाचा वतीने रोजी पद्मश्री डॉ.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त कोरोना योध्दा व एमपीएससी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.*
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे मा.योगेशजी बहल माजी महापौर व विद्यमान नगरसेवक यांनी भुषविले अध्यक्ष स्थानी मा. गौतम चाबूकस्वार माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कोरोणा काळात उल्लेखनीय कार्य करणारे आरोग्य क्षेत्रातील डॉ.राजेंद्र वाबळे अधिक्षक (वाय.सी.एम हाँस्पिटल,)डॉ.विनायक पाटील (विशेष वैद्यकीय अधिकारी )वाय.सी.एम हॉस्पिटल,डॉ.प्रविण पाटील (रूबी केअरविभाग प्रमुख वाय.सी.एम हॉस्पिटल, )डॉ.संदिप शेंडे (एम.एस.सर्जन संत तुकाराम नगर,)श्री.चाटे (पी.एस.आय संत तुकाराम नगर पोलिस चौकी)श्री.अशोक कोकाटे (पी.एस.आय संत तुकाराम नगर )किरण सुवर्णा (अध्यक्ष संत तुकाराम नगर व्यापारी संघटना,)श्री.अभिजित गोफण (सदस्य महाराष्ट्र राज्य महावितरण समिती,)श्री.मायला खत्री (माजी उपसभापती शिक्षणसमिती,)श्री.औदूंबर कळसाईत (संस्थापक अध्यक्ष पी.डी.फाउंडेशन )तसेच सोहम अभ्यासिकेतून अभ्यास करून पी.एस.आय म्हणून श्री.संदिप भिताडे व श्री.अजिक्य शेटे यांची निवड झाली असून या सर्वाचा सोहम सार्वजनिक ग्रंथालयात मा.गौतम चाबूकस्वार माजी आमदार व मा.योगेशजी बहल माजी महापौर विद्यमान नगरसेवक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.त्या प्रसंगी मा.गौतम चाबूकस्वार मा.आमदार यांनी संस्थेला भरीव मदत केली असून अजुनही संस्थेला योग्य ती मदत दिली जाईल असे सांगितले तसेच मा.योगैश बहल मा.महापौर यांनी संस्थेलाविद्यार्थ्यांनसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे सुचित केले*.
यापुर्वी हि सोहम अभ्यासिकेतून १५/१६ विद्यार्थी शासकीय सेवेत निवडले गेले आहेत.या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.सोहम ग्ंथालयाचे अध्यक्ष यांनी प्रास्तविक केले त्या प्रसंगी ग्ंथालयाचे पुढील विस्तारा बाबत माहिती दिली फिरते ग्रंथालय सुरू करणे मिलीटरी मध्ये उदा.NDA व इतर विभागातील अभ्यासक्रम बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे जास्तीत जास्त अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करून देणेअसे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री दिलीप चौधरी यांनी केले तर आभार सस्थेचे सचिव श्री प्रदिप बोरसे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ज्ञानेश्वर कांबळे, मायला खत्री,किरण सुवर्णा,गौरव चौधरी,मनोज सोनवणे,अनिल उपाध्ये,निर्मला नेरकर व वर्षा बोरसे यांनी सहकार्य केले.