कोकण येथील पोलादपूर तालुक्यातील कणगुळे गाव सवाद ग्रामपंचायत या ठिकाणी ८० घरे व जवळपास ४०० लोकसंख्या असणाऱ्या गावात पिंपरी चिंचवड शहरामधून वैयक्तिक व लोकसहभागातून जमा झालेली पुरग्रस्त मदत मधुकर बच्चे युवा मंच व भाजप भटके विमुक्त आघाडी यांच्यावतीने नुकतीच देण्यात आली. किराणा , कपडे याचबरोबर भांडी,मिक्सर,लाटणे ,रवी,अशी अनेक वस्तू काही दानशूर लोकांनी दिले.
तसेच पुरग्रस्थासाठी आवश्यक गोष्टीं साठीआर्थिक मदतही करण्यात आली. या साठी श्रीकांत भिलारे रायगड जिल्ह्या उपाध्यक्ष भाजयुमो तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य अलिबाग यांच्या पुढाकाराने पुरग्रस्त कणगुळे गावातील श्री. उमेश कालेकर:अध्यक्ष:नाईक मराठा सेवा संघ तसेच उप सरपंच सवाद ग्रामपंचायत सौ.आशाताई खेडेकर व अनेक ग्रामस्थ यांच्याकडे पुरग्रस्त मदत सुपूर्त करण्यात आली. या वेळी मान्यवर व ग्रामस्थ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्व मान्यवर व ग्रामस्थ यांनी मधुकर बच्चे युवा मंच व पदाधिकारी व दानशूर जनतेचे आभार मानले.
या उपक्रमात महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा पिंपरी चिंचवड शहर सचिव: जनसेवक; मधुकर बच्चे, भाजपा भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष: सौरभ शिंदे,
युवा पै:गणेश बच्चे पै:अभिजीत(बंटी) पवार,व्यवसायिक:पोपट बच्चे,मनोज भिवरे,राहुल तांबोळी,राजू कोरे,सागर जोशीआदींनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले तर भूषण भोंडे,समीर काळे,आदित्य नंदनवर,भार्गव कुलकर्णी,मयुरेश साळी, कारखानीस काका,पूजा कुककर्णी,पंकज घुले,नीता आचार्य,आदींनी या उपक्रमात विशेष मदत केली.
*या गावासाठी आणखी आणखी मदत आवश्यक आहे त्यामुळे पुढेही शक्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही श्री बच्चे यांनी यावेळी दिली.