पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने
स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त शहरात आज ‘एक घास मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आला.
आमदार व महाराष्ट्र महिला काँग्रेस च्या प्रभारी मा. प्रणिती ताई शिंदे यांची संकल्पनेनुसार राज्यभर हा कार्यक्रम घेण्यात आला होता.प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या नवलाखे यांच्या आदेशानुसार
आज पिंपरीगाव येथील न्यू जिजामाता हॉस्पिटल येथे कोरोना रुग्णांना व लस घेण्यास आलेल्या लोकांना अन्नवाटप केले.या उपक्रमास
डॉ तिरुमणी, डॉ करुणा साबळे, श्री मोहन कुदळे. जिजामाता हॉस्पिटल यांनी सहकार्य केले.
या वेळेस शहर अध्यक्ष सचिन साठे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, प्रबोधनकार शारदाताई मुंडे, माजी महिला प्रदेश अध्यक्षा शामला ताई सोनवणे, म प्र युवक सेक्रेटरी मयुर जेस्वाल, चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे, गौरव चौधरी, बाबा बनसोडे, मकरध्वज यादव उपस्थित होते.