सांगवी येथील निवृत्त प्राध्यापक नंदकुमार जाधव यांनी आज मावळमधील सहारा वृध्दाश्रमास साडेपाच हजार रूपयांची मदत देऊन आपला वाढदिवस साजरा केला.
आंदर मावळमध्ये अनाथ व निराधारांसाठी असलेल्या सहारा वृध्दाश्रमास त्यांनी सामाजिक कर्तव्य या भावनेतून ही मदत दिली.
परवाच झालेल्या तौक्ते चक्रीवादळात वृध्दाश्रमातील कौले व
छताचे मोठे नुकसान झाले आहे.या प्रसंगी प्रख्यात प्रवचनकार व ‘मी सावित्री बोलतेय ‘या एकपात्री कार्यक्रम फेम शारदाताई मुंडे, डाॅ अनिकेत जाधव, रोहिणी जाधव उपस्थित होते. सहारा वृध्दाश्रमाचे विजय जगताप यांनी हा मदतीचा धनादेश स्विकारला व प्रा जाधव यांना पुस्तके भेट दिली.