चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..
या वेळी आम आदमी पार्टीचे वैजनाथ शिरसाट यांनी महाराजांबद्दल बोलताना सांगितले की,छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे “छत्रपती” संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव. शंभूराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवरायांप्रमाणे दैदिप्यमान, रणभूमीवर पराक्रम गाजवणार्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त केला.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट दिलीप शिंगोटे यांनी मनोगत व्यक्त केले
गतिमान समाजव्यवस्थेमध्ये काळ बदलतो परिस्थिती बदलते आणि त्याप्रमाणे समाजव्यवस्था बदलते गेली अनेक युगे निघून गेली ज्याने जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष केला या संघर्ष मध्ये मराठी क्रांतीचा इतिहास रचला छत्रपती संभाजी महाराजांना ही भारत भूमी ही कधीही विसरू शकत नाही असे ते म्हटले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते अभय भोर उपस्थित होते तसेच आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते रवींद्रकुमार भडाळे यांनी आभार मानले