‘‘मी अलीकडचं बघतो, तू पलिकडचं बघ, असे ठरवत या शहराला क्राईम सिटी बनवली असल्याचे सांगत यांच्या कारभारामुळे महापालिका आयुक्तपण वैतागलेत असा हल्ला आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सांगवीत केला.
‘निर्धार परिवर्तन’ यात्रेच्या निमित्ताने सांगवी येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. अजितदादांच्या या जाहीर वक्तव्यामुळे शहरातील आपली सत्ता गेल्याचे शल्य त्यांना अजूनही ठसत असल्याचे यावेळी दिसून आले. ‘मी पहाटे ६ वाजता येऊन आयुक्तांबरोबर येथील विकासकामांसाठी बरोबर फिरयचो. आताचे कारभारी यावेळी साखरझोपेत असतात, असे त्यांनी म्हटले.