ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य संजय उबाळे यांनी आज (ता. ९) आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा केला.
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस येत्या 10 मे रोजी असल्याच्या निमित्ताने त्यांनी आपल्या व बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून सामाजिक कृतज्ञता व आदर्शाचा वस्तुपाठ घालून दिल्याबद्दल चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे.