पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येबद्दल शिवसेनेच्या युवा शाखेने पुढाकार घेत आज कामगार आयुक्त कार्यालय व जिल्हा उद्योग केंद्राला विळखा घालून स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली.
कामगार आयुक्त विकास पनवेलकर व जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक के. जी. डेकाटे यांना पिंपरी युवासेनेने निवेदन देत रोजगाराची आग्रही मागणी केली.
या प्रसंगी उपस्थित युवती सेनाधिकारी पिंपरी विधानसभा प्रतिक्षा घुले,विभाग संघटक निलेश हाके,उपविभाग संघटक सनी कड,ओंकार जगदाळे,रवि नगरकर, नंदकुमार देवकर आदी उपस्थित होते.