दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, आयुक्तांना निवेदन देऊन अशी मागणी पिंपरी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कासरवाडी येथील पिं. चिं. महानगरपालिकेचे ड्रेनेजचे काम सुरु असताना शेजारील इमारतीची सीमाभिंत कोसळून ६ वर्षीय मुलाचा दूर्दैवी मृत्यू झाल्या प्रकरणी पुढील १० दिवसांत दोषी अधिकारी यांना निलंबीत करुन व ठेकेदारावर गुन्हे दाखल करा. चौकशी सुरु न झाल्यास युवासेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा युवती सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
पालिका प्रभारी अधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देताना पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, नीलेश हाके, ओंकार जगदाळे, रवीनगरकर, सनी कड, नंदकुमार देवकर आदी उपस्थित होते.