प्रतिक्षाताई लक्ष्मण घुले (युवासेना, युवती सेनाधिकारी पिंपरी विधानसभा, पिं. चिं. शहर) यांच्या वाढदिवसानिमित्त अंध-आश्रमातील मुलांना अन्नदान करण्यात आले. तारा फाउंडेशन मध्ये अपंग व विकलांग मुलांकरीता लागणाऱ्या गरजू व उपयोगी वस्तु वाटण्यात आल्या तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात फळवाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रमोदभाऊ गायकवाड, विशालभाऊ चव्हाण, सनी कड, रविभाऊ नगरकर, ओंकार जगदाळे, गोरखमामा मेमाणे, सोन्या लांडे, निलेश यादव, प्रतिक मारणे, अजय पिल्ले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन युवासेना विभाग संघटक निलेश हाके यांनी केले होते.