पिंपरी चिंचवडमधील चित्रकार कु.आम्रपाली साबळे हिने रेखाटलेल्या कर्तबगार महिलांच्या रेखाचित्र प्रदर्शनास प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी आज भेट दिली.
येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आज श्री सराफ यांच्या “व्हॅक्यूम क्लिनर” या नाटकाचा खेळ होता.पद्मयानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या संयोजकांनी विनंती केल्यानंतर त्यांनी ती मान्य केली.यावेळी आम्रपाली हिने अशोक सराफ यांना त्यांचे तयार केलेले पोट्रेट भेट दिले. ट्रस्टचे सदस्य विजय जगताप यावेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनात देशभरातील ५० कर्तबगार महिलांची रेखाचित्रे असून सोमवार पर्यंत हे पाहण्यासाठी खुले आहे.