आशा भोसले पुरस्कारासाठी रंगमंचावर बसलेले पंडित ह्दयनाथ मंगेशकर आपले हुबेहूब रेखाचित्र पाहून भारावून गेल्याची घटना शनिवारी रात्री रामकृष्ण मोरे नाट्यगृहात घडली.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित आशा भोसले पुरस्कार वितरण कार्यक्रमाला ते आले होते.
कार्यक्रम सुरू असताना शहरातील स्थानिक चित्रकार कु. आम्रपाली साबळे या मुलीने पहिल्या रांगेत बसून ह्दयनाथ मंगेशकर यांचे चित्र पेन्सिलने काढायला सुरूवात केली आणि अवघ्या १० मिनिटात तिने आपल्या आवडत्या कलाकाराचे चित्र त्यांना भेट देण्याची इच्छा शेजारी बसलेल्या सुदाम परब या भाऊसाहेब भोईर यांच्या कार्यकरत्याकडे प्रकट केली. अवघ्या काही सेकंदात श्री. परब यांनी लगेच लगेच भाऊसाहेबांना खुणावले. कलेला उत्तेजन देणाऱ्या तातडीने तिला वरती बोलाविले. तिची कला पाहून ह्दयनाथजी हरखून गेले.
याच नाट्यगृहात तिने रेखाटलेल्या देशातील ५० कर्तबगार महिलांचे पेंटीग प्रदर्शन सुरू आहे. येत्या ११ मार्च पर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे.