जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन फेडरेशन तसेच डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ एक्ससिल्लेन्स वराळे कॅम्पस मध्ये ट्रस्टी माननीय अनुजा पाटील यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा झाला. कार्यक्रमाची सुरवात सरस्वती, तसेच गणेश वंदनेनं करण्यात आली.
प्रमुख पाहुण्या डॉ. राणीशेखर बचे गायनॉकॉलॉजिस्त आणि ओनर विग्नाहार हॉस्पिटल, सोमाटणे यांनी आरोग्यविषयी अतिशय उपयुक्त माहिती सांगितली, हेअल्थ ट्रिएंगल कसा स्टेबल ठेवता येतो ते सांगितले. डॉ. दिपाली चव्हाण डिरेक्टर आणि ओनर हेअल्थ सर्व्हिस प्रा. ली. फोनिक्स हॉस्पिटल थेरगाव. यांनी स्त्री ने आपली अस्मिता कशी जपावी, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव कायम ठेवा असा संदेश दिला. तसेच जागृती माणकांत फौंडेर प्रेसिडेंट पद्मा एडुकेशन सोसायटी यांनी स्त्रियांनी बिन्दास्त आयुष्य जगावं कोणाचाही मालकी हक्क स्वत:वर लादू नये. शाळेच्या प्राचार्य डॉ .सोनल पाटील यांनी सुंदर बोधक प्रसंगाने मार्गदर्शन केले. यानंतर शाळेच्या शिक्षिकांनी उस्फुर्त नृताने महिला दिनाची शोभा वाढवली. एम.बी.ए. च्या विद्याथिनींनीहि सुंदर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या सांगतेत केक कापून सर्वांचे तोंड गोड केले.