शुक्रवार दिनांक 8 मार्च 2019 रोजी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील निष्ठावंत भाजपाचे नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष विलासभाऊ मडीगेरी यांचा ओल्ड इज गोल्ड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपुलकीचा सन्मान केला. या सन्मानाने भावुक झालेल्या विलास मडेगिरी यांनी आपल्या सगळ्या जुन्या सवंगड्यांसमोर आपल्या राजकीय जीवनाचे चढउतार अगदी मनमोकळे पणाने मांडले. ते मांडत असतांना जुन्या आठवणींनी ते भावुक देखील झाले. महापालिकेत पक्षाने दिलेल्या या जबाबदारीचे स्वागत करुन पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करुन दाखवण्याचे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांसमोर दिले. भाजपच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना महापालिकेत सन्मानाची वागणुक त्याच बरोबर त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक कामाला योग्य न्याय दिला जाईल असेही विलास मडेगिरी यांनी सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांकडुन मिळालेला हा सन्मान म्हणजे मला अत्यंत स्वच्छ पध्दतीचे कामकाज करण्यासाठी मिळालेला खरा आशीर्वाद आहे या पद्धतीची भावना सन्मानाला उत्तर देतांना विलास मडेगिरी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास ओल्ड इज गोल्डचे प्रमुख राजू दुर्गे यांच्यासह नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस प्रकाश जवळकर, महादेव कवितके, शहर उपाध्यक्ष शेखर लांडगे, गणेश चव्हाण, नंदू भोगले, दत्ता कोरडे, संतोष घुले, द्वारकानाथ कुलकर्णी, पोपट हजारे, मंडल अध्यक्ष अजय पाताडे, दिपक कुलकर्णी, विजय शिनकर, दिलीप गोसावी, देवदत्त लांडे, दत्ता तापकीर, बापुसाहेब भोसले, रमाकांत पाटील, छाया पाटील, पुष्पा सुबंध, शोभा भराडे, राजश्री जायभाय, आशा काळे, राधिका बोरलीकर, नीता कुशारे, विणा सोनवलकर, रेखा कडाली, गिता महेंद्रु, विमल सानप, शबाना इनामदार, प्रमिला शिनकर, भिकाजी भोज, शशिकांत पाटील, कुमार कोनकर, प्रदीप सायकर, सुभाष पाठक, बालाजी कानवटे, आनंदा पाटील, प्रकाश सुर्यवंशी, संजय ओव्हाळ, जयदेव डेमरा, अमीर मुल्ला, यशवंत कोळेकर, दत्तात्रय यादव, प्रकाश हगवणे, रविंद्र कुदळे, शिवदास हांडे, प्रकाश धोंडे, अप्पा धावडे, बशीर सुतार, सुनिल सुर्यवंशी, सुनिल वाट आदी कार्यकर्ते उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी केले. सुत्रसंचालन देवदत्त लांडे यांनी तर आभार दिपक कुलकर्णी यांनी मानले.