जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित देशातील ५० कर्तबगार महिलांची रेखाचित्रे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील कलादालनात पद्मयानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ८) आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार व पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्त्या कुंदाताई संजय भिसे, उद्योगपती कुंदन ढाके, निता परदेशी, निर्मला जगताप, संदीपान साबळे, आदी यावेळी उपस्थित होते.
येत्या ११ मार्च रोजी सुरू राहणार असलेल्या या प्रदर्शनामध्ये राजमाता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, मदर तेरेसा, सिंधूताई सपकाळ, सुप्रिया सुळे, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज, पंकजा मुंडे, सायना नेहवाल, सानिया मिर्झा आदी एकूण ५० कर्तबगार महिलांची रेखाचित्रे येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.