पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे फर्डे वक्ते, अभ्यासू व्यक्तिमत्व ॲड. गोरक्ष लोखंडे यांची पक्षाच्या कायदा सेलच्या पिंपरी चिंचवड अध्यक्षपदी काल नियुक्ती झाली.
भोसरी येथे मंगळवारी (ता. ५) झालेल्या जाहीर सभेमध्ये पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ॲड. लोखंडे यांना नियुक्तीचे प्रमाणपत्र दिले. माजी नगरसेवक असलेले ॲड. लोखंडे हे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. वर्क्तृत्वाच्या अनोख्या शैलीमुळे राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचाराचे ते स्टार कॅम्पेनर म्हणून ओळखले जातात.