पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग वायसीएमएच झोन अंतर्गत संपूर्ण म्हाडा कॉलनीमधील नागरिकांची मोफत करोना अँटी रॅपिड चाचणी आज ( रविवारी)करण्यात आली.
यामध्ये ६६ नागरिकांची तपासणी करण्यात आली .या उपक्रमाचे आयोजन पी सी सी ए ग्रुप, व योगेश भाऊ तायड़े युवा मंच ,आरंभ सोशल फाउंडेशन, श्री दिपक भोजने मित्र परिवार,यांनी केले होते .स्वराज्य ग्रुप ओकांर मित्र मंडळ,माणुसकी प्रतिष्ठान, रिव्हरडेल हौसिंग सोसायटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग वायसीएमएच झोन यांचे यासाठी सहकार्य लाभले.