राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी चिंचवड शहर युवासेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
भोसरी क्षेत्रातील पोलीस वाहतूक पोलीसांना अर्सनीक अल्बम -30होमिओपथी गोळया, मास्क, सेनेटायजर तसेच फुगेवाडी-कासारवाडी मधील गरीब लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल भवारी श्री.कारवे, पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, सौ. शीला मामी जाधव, नंदूभाऊ काची,अंकुश जाधव, महेश बोधले, आदी यावेळी उपस्थित होते.