सरकार द्वारे लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन च्या दूस-या टप्प्याच्या कालावधीत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने मदत कार्याचा दुसरा टप्पा सुरू करून गरजूनां सातत्याने मदत कार्य केले जात आहे.
या पूर्वी पहिल्या टप्प्यात प्रथम लाॅकडाऊन काळात शहर युवक काँग्रेस ने अन्नधान्य वाटप, भाजीपाला वाटप, रक्तदान, मदतकार्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा कृतज्ञता पर सन्मान व पोलिस दलासाठी मास्क, सुरक्षा हातमोजे व सॅनिटायजर यांचे वाटप केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर सुरू केलेल्या हेल्पलाईन द्वारे शहरातील विशेषत: परराज्यातील गरजू व अडचणीत असलेल्या कामगारांची माहिती प्रदेश स्तरापर्यंत व प्रदेश स्तरावरून जिल्हा व शहर स्तरापर्यंत दिली जाते व या माहितीच्या आधारे शहर युवक काँग्रेस संबंधित गरजूनां मदत पोहविण्याचे काम करत आहे.
“कोरोना (कोव्हीड १९) या जीवघेण्या व संसर्गजन्य विषाणूच्या सतत वाढत्या प्रादुर्भावा च्या काळामध्ये सरकारकडून लाॅकडाऊन चा दुसरा टप्पा जाहीर करण्यात आला व मोठ्या प्रमाणात कामगार, मजूर, कष्टकरी, रोजंदारी वर काम करणारा वर्ग व परराज्यातील कामगार अधिकच खचत चालला आहे या पार्श्वभूमीवर वर शहर युवक काँग्रेस कडून या वर्गातील गरजूनां अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.
तीन किलो तांदूळ, दोन किलो पीठ, १ किलो साखर, अर्धा किलो दाळ, अर्धा किलो तेल, चहापत्ती पूडा, ३ मसाला पाकीटे, कपड्याचा व अंगाचा साबण अशा साहित्याचे पॅकेटस् देऊन गरजूनां मदत केली जात आहे”, असे युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.
या मदत कार्याद्वारे हवालदिल झालेल्या रोजंदारी मजूरांना मोठा आधार मिळत आहे, बचतीचे सर्व पैसे संपल्याने व रोजगार हि गेल्याने त्यांना सद्यस्थिती त मदतीची नितांत गरज आहे व हिच गरज जाणून संघटनेतील सहकारी मित्र व समाजातील दानशूर व्यक्तीं कडून मदत निधी जमा करून हे काम केले जात असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.
या कार्यासाठी पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, शहर सरचिटणीस राहूल काळभोर, युनूस बागवान, विरेंद्र गायकवाड, सिध्दार्थ वानखेडे हे सर्व परिश्रम घेत आहेत.