चिंचवडगावातील ज्येष्ठ गायक , संगीतकार कै वसंतराव जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज ( रविवारी) अभिवादन करण्यात आले.
शहरामध्ये शास्त्रीय गायन , वादन व संगीतकलेची मुहूर्तमेढ रोवण्यामध्ये वसंतराव जोशी यांचा सिंहाचा वाटा होता. आज चिंचवडगावात महापालिकेने उभारलेल्या त्यांच्या नामफलकास अभिवादन करून श्रध्दांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र न्यूजचे संपादक दादाराव आढाव, वास्तव चक्रचे संपादक दिपक श्रीवास्तव, व जोशी कुटूंबातील मदन जोशी उपस्थित होते.