पिंपरी रेल्वे स्थानकाशेजारील अनधिकृत भाजी मंडई हटविणे गेल्या १९ वर्षात पालिका प्रशासनाला शक्य झाले नव्हते. मात्र कोरोनाचे संकट आणि सोशल डिस्टनसिंगचे बेधडकपणे उल्लंघन करणा-या भाजी विक्रेत्यांवर अखेर काल पालिकेने वरवंटा फिरविला.
काल( बुधवारी ) सायंकाळी चार वाजता या कारवाईला सुरूवात झाली. एरव्ही राजकीय नेते, कार्यकर्त यांच्या दबावामुळे व भाजी विक्री करणा-यांच्या आकांडतांडवामुळे येथे कारवाई करायची म्हटले तर “ आपले मरण पाहिले म्या डोळा” अशी पोलिस , प्रशासन व राजकारण्यांची अवस्था व्हायची.
मात्र कोरोनाचा लाॅकडाऊन यामुळे ही कारवाई बघायला व सावरायलाही देखील कोणी आले नव्हते.अवघ्या दिड तासात संपूर्ण भाजीमंडई निष्कासित करण्यात आली.सदर कारवाईत मा.अजित पवार,अतिरीक्त आयुक्त(२),कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी,बीट निरीक्षक श्रीमती.प्रियंका म्हस्के,अतिक्रमण विभागाचे ८ पथक ,तसेच पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निकम इत्यादी अधिकारी कारवाईस उपस्थित होते.