गेल्या सहा दिवसांपासून फुगेवाडी, कासारवाडी, दापोडी भागातील निराधार, बेघर , कुष्ठरोगी व बाहेरगावच्या विद्यार्थ्यांच्या भूकेच्या हाकेला युवासेनेचा निलेश हाके धावून जात असल्याचे दिलासा देणारे चित्र आढळून येत आहे .
सध्या पिंपरी चिंचवड शहरात हातावर पोट असणारे गोरगरीब , शिक्षण घेत असलेले युवक,भिक्षेकरी यांच्यासाठी विविध संस्था व संघटना या संकटकाळात माणूसकीची भिंत बनून मदतीसाठी उतरल्या आहेत . राज्यात असो की देशात पूर, भुकंप, दुष्काळ या स्थितीत कपडे, भांडी व जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी सर्वच जण सरसावून पुढे येतात असा इतिहास आहे. मात्र सध्या कोरोनाच्या स्थितीत लोकांची दोन वेळेची भूक भागवणे हाच कार्यक्रम सर्व पक्ष, व संस्था , संघटनांनी हाती घेतला असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेचे संघटक म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले निलेश हाके यांनी शहरात सर्व प्रथम अकरा हजार रूपये मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देऊन एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला. एवढयावरच न थांबता सेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा दिवसांपासून रोज ६०० जणांना ते अन्नदान करत आहेत. फुगेवाडीतील आनंदवन कुष्ठरोग आश्रम , रतिलाल परिसरातील गोरगरीब रहिवासी, शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना रोज दोन वेळचे जेवण देऊन निलेश हाके यांनी अन्नदानाचा हा जागर पेटता ठेवला आहे. येथील आशिर्वाद महिला बचत गटाच्या शिला जाधव यांची त्यांना याकामी साथ लाभली आहे. त्यांच्या या ‘भूकेची हाक’ या उपक्रमास दानशूरांनी किराणा वस्तू,तेल व गहू , तांदूळ देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे( मदतीसाठी संपर्क-निलेश हाके
7057788685)