आधीच दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने मेटाकुटीस आलेल्या शहरवासियांची अवस्था आता पाणी नसल्याने पुन्हा जीव टांगणीला लागणारी ठरणार आहे.
उदया (गुरूवारी १९ मार्च) निगडी येथील जलवाहिनीच्या दुरूस्तीमुळे उदया शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेने कळविले आहे. दरम्यान शनिवारी १४ तारखेलाही वीजपुरवठा खंडीत झाल्याने शहराला दिड दिवस पाणी आले नव्हते. त्यामुळे या चालू आठवड्यात तीन दिवस फक्त पाणीपुरवठा झाल्याचे स्पष्ट चित्र आहे.