कोरेना विषाणूच्या संसर्गाचे पुण्यात वाढत चाललेले प्रमाण व त्यामुळे त्याची खबरदारी घेणे महत्वाचे असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी युवासेने तर्फे चोवीस तास कर्तव्यदक्ष असलेल्या भोसरी पोलीस स्टेशन मधील पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे,आर. डी. तापकीर, तात्या तापकीर, रविंद्र जाधव, सौ. मंदा गायकवाड, सौ. रेखा थोरात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन युवासेना विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाच्या सौ. शीला जाधव, सामाजिक कार्यकर्ते नंदूभाऊ काची यांनी केले.