यमुनानगर निगडी भागामध्ये मणिकर्णिका फौंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २०० महिलांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन मुक्ता गोसावी, शिल्पा नगरकर, अदिती धुळे, अनुष्का वैंशपायन, अंजली पांडे, प्रियांका देशमुख, शर्मिला मेहेर, अभा जोशी, तृप्ती जोशी, वैदेही चौधरी, यांनी केले होते.
यासंदर्भात प्रभागातील सर्व महिला भगिनींना आग्रहाचे निमंत्रण आणि या रॅलीमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुप्रिया उत्तम केंदळे आणि नगरसेविका सौ. कमल बापू घोलप, श्री. आदित्य कुलकर्णी यांनी केले होते.