एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिका असलेल्या तरूणीची मृत्युशी सुरू असलेली झुंज आज पहाटे संपली. पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या युवतीप्रमुख तेजस्विनी कदम यांनी तातडीने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आरोपीला विलंब न लावता तातडीने शिक्षा देण्याची मागणी केली.
शहरातील युवतींचे नेतृत्व करत असलेल्या तेजस्विनी कदम यांनी या तरूणीच्या निधनाबद्दल दु:ख व तिला मृत्युच्या खाईत लोटणाऱ्या आरोपीबद्दल संताप व्यक्त केला. या घटनेमुळे तरूणींमधील आत्मविश्वास ढासळला असल्याची जाब त्यांनी श्री. ठाकरे यांना पाठविलेल्या संदेशात अधोरेखित केली. निर्भयाप्रमाणे या प्रकरणास न्याय मिळायला वेळ लागू नये तसेच हैदराबाद पोलीसांचे उदाहरण महाराष्ट्र पोलीसांनी डोळयासमोर ठेवण्याची गरज असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या भूमीतील महिला सुरक्षितच आहेत असा संदेश सरकारने आपल्या कृतीतून दयावा अशी मागणी तेजस्विनी कदम यांनी केली.