येत्या शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत असून डोईजड झालेला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पक्षाचा झाडू रोखण्यासाठी पिंपरीतील चार जणांची टिम दिल्लीत प्रचार करीत आहे.
भाजपाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी देशभरातून क्रिम कार्यकर्त्यांची मांदियाळी दिल्लीत दाखल झाली आहे. सुरूवातीला प्रचारामध्ये मुद्दा काय घ्यायचा हा प्रश्नचिन्ह पडलेल्या भाजपला शाहिनबाग प्रकरणानंतर चांगलाच धागा सापडला आहे. दिल्लीतील प्रत्येक घर पिंजून काढण्याची मोहिम भाजपच्या मंडळींनी हाती घेतली आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडचे राजेश पिल्ले, उमा खापरे, शैला मोळक व केशव घोळवे हे चार जण दिल्लीतील प्रचाराची खिंड लढवित आहे.