(विजय जगताप)
आपली स्टाईल, रूबाब, मर्दानी अंदाज, व बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असलेले आणि हजारो तरूणांच्या गळयातील ताईत असलेल्या आमदार महेश दादा लांडगे यांच्या नव्या लूकची आता शहरभर चर्चा सुरू झाली आहे.
सहा फूट उंची, शंभर किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या या धिप्पाड व्यक्तिमत्वाने आता छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण होईल अशी दाढी ठेवली आहे.त्यांच्या या नव्या लूकला तरूणाईने व त्यांच्यांवर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांनी सोशल मिडियावर लाईकचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.
नगरसेवक असताना व आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये लहान दाढी व नंतर पूर्ण दाढी महेशदादांनी ठेवली होती. वास्तविक सध्या तरूण पोरांमध्ये मागील दोन तीन वर्षापासून “बिअर्ड इज न्यू हॉट” म्हणजेच दाढीधारी पुरूष अशी हॉटपणाची नवी व्याख्या मानली जाऊ लागली आहे. पूर्वी म्हणजे सहा वर्षांपूर्वी महेशदादांनी लहान दाढी ठेवली होती.ही स्टाईल म्हणजे दाट दाढीचाच प्रकार होता फक्त त्यामध्ये ट्रिमर वापरून ते फक्त आकार देत होते. नंतर महेश दादांनी पूर्ण दाढी ठेवण्यास सुरूवात केली.फुल बिअर्ड असे म्हटली जाणारी ही स्टाईल तशी जुनीच म्हणावी लागेल, परंतू ती आता पुन्हा आली आहे.महेशदादांचे अनुकरण करीत शेकडो पोरांनी मग बॉडोल्ड,गॅरिबाल्डी, आणि व्हर्डी असे फुल दाढीचे प्रकार आपल्या चेहऱ्यावर ठेवल्याची वस्तुस्थिती आहे.
पुर्वीचे महेशदादा
मागील महिन्यात शहर भाजपा अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यापासून महेशदादांनी दाट दाढी हा नवा स्टाईल प्रकार निवडला.पद्मावत पिक्चरमध्ये रणवीर सिंगने साकारलेल्या खिलजी या पात्राची दाढी याच प्रकारात मोडणारी आहे. महेश दादांनी ठेवलेल्या सध्याच्या दाट दाढीला म्हणजेच थिक बिअर्डला महाराष्ट्रात किंग लूक म्हणूनही ओळखतात.कारण हा लूक जवळपास शिवाजी महाराजांच्या लूक प्रमाणे आहे.
आपल्या राजेशाही व रूबाबशीर कामकाज पध्दतीसाठी ओळखले जाणारे महेशदादा आता नव्या लूकमुळे अधिक चर्चेत आले आहेत.