सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रसंगी दिलेली स्थगिती व यामुळे मराठा आरक्षणाला निर्माण झालेला अडथळा या पार्श्वभूमीवर आमदार, खासदारांचे लक्ष वेधण्यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या वतीने आज संबळ वाजवून आंदोलन करण्यात आले.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे यांच्या घरी जाऊन दारासमोर संबळ वाजवून या प्रकरणी त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
सकाळी अकरा वाजता खासदार बारणे यांच्या घरापासून या आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर शहरातील तीनही आमदारांच्या घरी जाऊन त्यांच्या दारात हे प्रतिकात्मक आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणप्रसंगी दिलेली स्थगिती व यामुळे मराठा आरक्षणाला निर्माण झालेला अडथळा या पार्श्वभूमीवर आमदार, खासदारांचे लक्ष वेधण्यासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या संघटनांच्या वतीने आज संबळ वाजवून हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
बारणे हे संसद अधिवेशन चालू असल्याने दिल्लीत होते.त्यांच्या वतीने पीए उदय आवटे यांनी निवेदन स्विकारले. त्यानंतर शहरातील तीनही आमदारांच्या घरी जाऊन त्यांच्या दारात हे प्रतिकात्मक आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात आले. मराठा आंदोलकांचे वतीने तयार केलेले निवेदन चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्विकारले. मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, ॲड. लक्ष्मण रानवडे ,छावा मराठा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, संभाजी बिगेड चे सतिश काळे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.