वै ह भ प पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांच्या हस्ते सी व्ही रमन यांच्या प्रतिमेस हार घालून करण्यात आले.
या प्रदर्शनात पवनचक्की, ऋतुचक्र, जलस्रोत, जलशीतनी, जलचक्र, प्राणीसंग्रहालय, प्रदूषणाचे प्रकार, द्रव्य-द्रावके, जलशुद्धीकरण यंत्र, जलप्रदूषण, सौरप्रणाली, चित्रपट प्रक्षेपण यंत्र, चंद्राच्या विविध कला, मजला शेती, सफाई यंत्र, आम्लवर्षा, विद्युत ध्वनिक्षेपक, सामान्य ज्ञानाची चाचणी घेणारे यंत्र, वाय-फाय यंत्र, वातानुकूलित यंत्र, विद्युत घंटा, सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया, दुर्बिण, तपासणी यंत्र, प्रकाश परिवर्तन नियम, मोबाइल चार्जेर, फ्लोअर क्लिनींग मशीन, गुणसूत्र प्रतिकृती, विविध वैज्ञानिक प्रयोग आदी उपकरणे विद्यार्थ्यांनी सादर केली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या हुशारीचे भरभरून कौतुक केले.
यावेळी स्वाती दुरगुडे यांनी विज्ञान दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, संगीता पराळे, सविता आंबेकर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पूजा क्षीरसागर यांनी केले.