छायाचित्रकार, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता या तीनही आघाड्यांवर यशस्वी कार्य केलेले जेष्ठ पत्रकार मदन जोशी यांचा नुकताच पिंपरी येथे सन्मान करण्यात आला.
अखिल मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या प्रथम अधिवेशनात श्री जोशी यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. तालेरा हॉस्पिटल चिंचवड येथे ब्लड बँक उभारणीसाठी श्री जोशी यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून मोठे यश मिळवले होते. कै. वसंतराव जोशी या आपल्या वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करून कलेची जोपासना करण्याचे कार्य ते करतात. त्यांच्या उचित कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्या हस्ते श्री. जोशी यांना गौरविण्यात आले. शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, पत्रकार संघाचे संस्थापक बापूसाहेब गोरे, संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव ,सरचिटणीस सुनील कांबळे आदींसह सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार माधव सहस्त्रबुद्धे, विनायक चक्रे, छायाचित्रकार नरेश नातू, यशवंत नामदे ,अतुल मारवाडी यांचाही सन्मान करण्यात आला.
