————
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा तयार करणारी पहिली महिला शिल्पकार असलेल्या शिवमती सुप्रिया शेखर शिंदे यांना मराठा सेवा संघ दिनदर्शिका 2022 आज भेट दिली.
मराठा सेवा संघ उद्योग कक्ष चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव व सोबत शेखर शिंदे, पत्रकार विजय जगताप ,मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे, संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड सतिश काळे उपस्थित होते.
यावेळी मराठा सेवा संघ शिष्टमंडळाने शिल्प सिद्धी सक्लप्चर प्रा. लिमिटेड ,आंबेगाव ,पुणे येथील त्यांच्या प्रसिद्ध शिल्पकला स्टुडिओस भेट देऊन पाहणी केली.