ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिग्रेड व जिजाऊ बिग्रेड या संघटनांच्या वतीने त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष राजू डुबल, कार्याध्यक्ष रघुवीर तुपे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अॅड लक्ष्मण रानवडे, मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री प्रकाश जाधव, जिजाऊ बिग्रेड प्रदेश अध्यक्षा माधुरी ताई भदाणे, जिल्हा अध्यक्षा सुनिता ताई शिंदे, शितलताई घरत, शालन ताई घाटुळ, रत्नमाला ताई खराडे, माणिकताई शिंदे, स्मिताताई मस्कर संभाजी ब्रिग्रेड प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा अध्यक्ष उत्तम कामटे, मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर सचिव सचिन दाभाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
3जानेवारी ते 12जानेवारी पर्यंत या वर्षीपासून “जिजाऊ – सावित्री : सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा “हा उपक्रम शाळा, कालेजमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आल्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यात आले. तसेच यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा परिसरात मशाल उत्सवाचे आयोजन करण्यात आले.