कोवीड महामारीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डाॅ प्रविण बढे यांना नुकताच कोविड यौद्धा पुरस्कार म्हणून स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख अॅड सचिन भोसले,शिवसेना महिला पुणे जिल्हा संघटिका सौ. सुलभाताई उबाळे, पि.चि.शहर महिला संघटिका उर्मिला ताई काळभोर, उपशहर प्रमुख शैलेश मोरे, विभाग प्रमुख शरद हुले यांच्या हस्ते देण्यात आला .
या प्रसंगी प्रिस्टाइन आयुर इंडिया कंपनीचे पदाधिकारी व कामगार नेते व कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांनी कोवीड महामारीच्या काळात त्यांच्या प्रिस्टाइन आयुर इंडिया औषधी कंपनी च्या मार्फत एक लाख दुर्धर आजारी लोकांना बरे केले व गेली 15 वर्ष तीन लाख रुग्णांसाठी देवदूत ठरले आहे तसेच हजारो महिलांना व तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक व करोना महामारीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण त्यांच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना केंद्र सरकार तर्फे शौर्य भारत पुरस्कार,भारत भूषण पुरस्कार व साई फाउंडेशन तर्फे देवदूत पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी शिक्षण मंडळ सदस्य कैलास नेवासकर ,महिला विभाग संघटिका सौ.उज्वला सावंत, विभाग प्रमुख दिलीप सावंत यांनी केले होते.