वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पिंपरी महानगरपालिकेच्या जुन्या भोसरी रुग्णालयात येऊन कोवॅक्सिन लस घेतली.
लसीचा हा त्यांचा पहिला डोस होता.याप्रसंगी भोसरी हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. शैलजा भावसार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय सोनेकर व शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आज ६७ वा वाढदिवस आहे.राज्यात लॉकडाऊन असल्याने कार्यकर्त्यांनी लॉकडाऊन तोडून शुभेच्छा देण्यासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी कालच केले होते. कार्यकर्त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत आपापल्या परिसरातच बाळासाहेबांचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा केला.