( विजय जगताप)
उत्तरोत्तर रंगत चाललेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीला आता कुणाचा कोणाला आशिर्वाद व छुपा पाठिंबा याचा ताळमेळच राहिला नसल्याने बहार येऊ लागली आहे.
व्याख्याते असलेले अपक्ष उमेदवार डाॅ श्रीमंत कोकाटे यांनी परवा( मंगळवारी) भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यावेळी उपस्थित होते.आज पुणे व सातारा येथील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये व सोशल मिडियात हे फोटो आल्याने व आपणास उदयनराजे यांचा आशिर्वाद असल्याचे डाॅ कोकाटे यांनी जाहीर केल्याने भाजपाची नेतेमंडळी अवाक् झाली आहेत.
उदयनराजे राष्ट्रवादीत होते तरी त्यांचा स्वत:चा स्वतंत्र अजेंडा व कार्यक्रम चालत असे.
या सा-या घटना व घडामोडी पाहता “ सांगताही येईना व बोलताही येईना” अशी गत भाजपची झाली आहे.