भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधुन तसेच कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करीत वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने लांडेवाडी, भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सार्वजनिक रित्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन करण्यात आले.
या वेळी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष इंजि. देवेंद्र तायडे, माजी महिला अध्यक्षा लताताई रोकडे, माजी नगरसेवक अंकुश कानडी, कार्याध्यक्ष सुहास देशमुख, महासचिव रहीम भाई सय्यद, प्रवक्ते के. डी. वाघमारे, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, संघटक बाबुराव फुलमाळी, शहर कार्यकारीणी सदस्य राजन नायर, माजी युवक अध्यक्ष गुलाब पानपाटील,सम्यक विद्यार्थी आंदोलन शहराध्यक्ष संतोष जोगदंड, बबन सरोदे, अतुल भोसले, रवींद्र पारधे, राहुल इनकर, राहुल बनसोडे,शरद वाघमारे, संजय वाघमारे, शशिकुमार टोपे,गौरी शेलार, सुलक्षणा रायन, संगीता शहा, सुनीता गायकवाड, शारदा बनसोडे, दीप्ती नितनवतरे, विठ्ठलनगर वॉर्ड शाखा अध्यक्ष अमोल माने,बालाजीनगर वॉर्ड शाखा अध्यक्ष निलेश कांबळे, बौद्धनगर वॉर्ड शाखा अध्यक्ष भीम गायकवाड,सहदेव कसबे,विजय गेडाम,मंदाकिनी गायकवाड,अशोक कदम,विशालनगर वॉर्ड शाखा अध्यक्ष गजेंद्र कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.