मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थीनींना दिलासा दयावा, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळास भरघोस निधी द्यावा या व इतर मागण्यांचे निवेदन आजपिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमिती प्रमुख ना.अशोक चव्हाण यांना दिले.सदर निवेदन पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त मा.कृष्ण प्रकाश तसेच पिंपरी चिंचवड च्या तहसीलदार श्रीमती गायकवाड यांचेकडे देण्यात आले. या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड चे समन्वयक सतिश काळे, प्रकाश जाधव, मारूती भापकर,धनाजी येळकर पाटील,गणेश दहिभाते,नकुल भोईर, अभिजीत म्हसे, ज्ञानेश्वर लोभे इत्यादी प्रमूख कार्यकर्ते उपस्थित होते.