( विजय जगताप)
मेकअपशिवाय आपल्या आवडत्या नेत्याला वा अभिनेत्याला बघायची त्यांच्या चाहत्यांना बिल्कूल सवय नसते परंतू बेधडकपणे आपल्या मूळ रूपात येत, निर्सगाचे ऋतुचक्र मान्य करण्याची व जनतेनेही ते स्विकारावे असे धाडस ग्लॅमर क्षेत्रातील काही मंडळींनी नुकतेच केले आहे.
मार्चपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊन काळात केस कापणे, रंगवणे या सा-या गोष्टींना ब्रेक बसल्याने सामान्य माणसांपासून ते ग्लॅमर क्षेत्रातील मंडळींनाही आपल्या मूळ रूपात आता वावरावं लागत आहे. मात्र आपली छबी लपविणारे व त्यावर कृत्रिमपणे पांघरूण घालणारे काही अभिनेते व नेते लाॅकडाऊन काळातही सक्रीय राहिले. परंतू आपलं पांढरं रूप जराही न लपविता कॅमे-यासमोर दाखविण्याचं धाडस देशातील टाॅपच्या विविध क्षेत्रातील चार मंडळींनी नुकतंच करून दाखविलं. रितेश देशमुख, राहुल गांधी, सुप्रिया सुळे व महेंद्र सिंग धोनी अशी त्यांची नावे आहेत.
एरव्ही डोक्यामध्ये एक पांढरा केस जरी दिसला तरी अस्वस्थ होणे ही जवळपास प्रत्येकाची मानसिकता असते.केस पांढरे होण्याचा प्रवास हा वयाच्या तिशीनंतर ख-या अर्थाने सुरू होतो.मग मेहंदी, हेअर डाय हे उपाय करून कृत्रिमपणा साधण्याची ज्याची त्याची धडपड सुरू होते.राजकारणी असो की नट नटया आपले वय लपविण्यात प्रवीण असतात. त्यामुळे धर्मेन्द्र (८८) दिलीप कुमार(९२) हेमा मालिनी (६६) जितेंद्र (७७)माधुरी दिक्षित ( ५३) रेखा(६७) ते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, मायावती, अजित पवार आदींनी आपले पांढरे डोकं तर लय लांब एक केस देखील पांढरा न दाखविण्याचीच काळजी घेतली व घेत आहेत.
पांढ-या केसांच्या बटेतदेखील सौंदर्य शोधलं ते इंदिरा गांधी यांनी, त्यांना ते शोभूनही दिसायचे.त्यामुळे वरील चार मंडळींनी आपले खरे रूप दाखवून निसर्गाचा आविष्कार मान्य करत आपल्या चाहत्यांपुढे एक आदर्श घालून दिला आहे.