साहित्य, संगीत, कला, नाट्य व चित्रपट क्षेत्रात शहरातील सुमारे दोनशे कलावंत कार्यरत असून कोरोनामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेने त्यांना मदत करावी अशी मागणी वसंत कला फिल्मचे संचालक मदन जोशी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
सांस्कृतिक केंद्र म्हणून पिंपरी चिंचवडचे महत्त्व अलिकडच्या काळात वाढले आहे. शहरात विविध कला क्षेत्रातील मंडळींचे वास्तव्य असून नाट्य, चित्रपट , मालिका या मनोरंजनाच्या माध्यमांवर त्यामुळे कु-हाड कोसळली आहे . त्यामुळे पालिकेने या सर्वांना मदतीचा हात दयावा असे जोशी यांनी आयुक्त व महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.