कोरोना विषाणूच्या काळात कामगार, मजूर, कष्टकरी लोकांचे जणजीवन विस्कळीत झाले आहे. आज ओंकारनगर दापोडी येथील लोकांना पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला गटाकडून अन्नधान्य किट वाटण्यात आले. 23मार्च सौ. सुलभाताई उबाळे( ज़िल्हा संघटिका पुणे ज़िल्हा ) ह्यांच्या वाढदिवसाच्या निम्मित पासून पिंपरी युवासेना व आशीर्वाद महिला गटाकडून परगावचे विध्यार्थी, गरजू व गरीब लोकांना मोफत भोजन देण्यात आले. महिन्याभर पासून सुमारे 8000जणांना मोफत भोजन देण्यात आले. तसेच परप्रांतीय मजूर, गरीब व गरजू, रिक्षाचालक ह्यांना अन्नधान्य 946किट वितरित करण्यात आले. ह्यावेळेस पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, आशीर्वाद महिलाच्या सौ. शीला मामी जाधव, गोरख नेटके, महेश बोधले, रेखा थोरात,अविनाश जाधव, भावेश पटेल, प्रमोद गायकवाड,रमेश पवार, राहुल जाधव, संतोष आढाव, उपस्थित होते.