( विजय जगताप)
बिग बाॅस या देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मालिकेमध्ये घरात बसून विजेते होण्याची संधी ‘सिझन १३ ‘पर्यंत टिव्हीवर आपण पाहिली. आता एकवीस दिवस कुटूंबासह आपणच घरात लाॅक होत असल्याने बिग बाॅसचा फिल सर्वांनाच अनुभवायची संधी कोरोनामुळे आपसूकच मिळाली आहे.
कुठलेही संकट हे नेहमी संधी निर्माण करत असते असे म्हटले जाते. एरव्ही चाकरमनी असो की व्यावसायिक एकदा आवरलं की घराबाहेर पडणं ही सर्वांची नित्याची बाब बनली होती. ८५ टक्के जनता तर फक्त रात्री झोपायला घरी परतत असल्याचं वर्षानुवर्षाचे चित्र होतं. आठवडयातील सुट्टीचा उपयोग मग हिंडणे -फिरणे यातच जात असल्याने पूर्ण वेळ घरी राहणे हे वृध्द आई वडील, गृहिणी व पाच वर्षाच्या बालकाशिवाय कोणालाच शक्य झालं नव्हतं. मात्र कोरोनाने सक्तीचे घरी थांबणे हाच एकमेव इलाज असल्याचे दाखवून दिल्याने आता आपलेच घर समजून घेणे व घराचे रूप नव्याने उलगडण्याची संधी निर्माण झाली आहे.
घराचे व्यवस्थापन असे असते होय? हा पण शोध पुरूष मंडळींना नव्याने लागला आहे.टिव्ही पाहणे, गप्पा मारणे आणि उरलेल्या वेळात मोबाईल मध्ये डोके घालणे हाच एककलमी कार्यक्रम आता सुरू झाला आहे.
फरक फक्त इतकाच आहे की तुम्ही टिव्ही, मोबाईल पाहू शकता जे बिग बाॅसमध्ये नसायचे.या लोकप्रिय मालिकेत ज्या प्रमाणे घरात बसून ड्रामा, भांडणे, शह काटशह , व कुरघोडीचे खेळ रंगतात अशी रंगत आता कुटूंबाकुटूंबामध्ये न रंगो हिच कोरोनाकडून अपेक्षा..!