पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड शहर अहिल्यादेवी महोत्सव समिती यांच्या वतीने आज ३१ मे २०१९ रोजी अहिल्यादेवी यांची २९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आज सकाळी १०.३० वाजता महापौर राहुल जाधव व स्थायी समिती अध्यक्ष विलासभाऊ मडीगेरी यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापालिकेच्या माध्यमातुन घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा आणि पाककला स्पर्धा या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. त्यानंतर उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक खरात, उपाध्यक्ष अभिजित शेंडगे, कार्याध्यक्ष महावीर काळे, मार्गदर्शक राजू दुर्गे, विना सोनवलकर, शिवाजी बिटके, राजू घोडके, मारकड साहेब, अजयदादा दुधभाते, सुनिल वाघमोडे, गणेश खरात, पोपट हजारे, सुनिल बनसोडे यांच्या शुभहस्ते महापौर व स्थायी समिती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करुन मुंबई मधिल १०० ढोल व १०० ताशांचे सामना नावाच्या पथकाची सलामी देण्यात आली. धनगर संस्कृतील गजनृत्य, धनगरी ओव्या, सांस्कृतिक कार्यक्रमांचा सामना, असे अनेक कार्यक्रमांची जुगलबंदी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड शहर अहिल्यादेवी महोत्सव समितीच्या माध्यमातुन करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड मनपा विरोधी पक्षनेते दत्ता साने, आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, नगरसेविका प्रियंका बारसे, अनुराधा गोरखे, सिमा सावळे, आशा शेंडगे, तुषार हिंगे, मोरेश्वर शेंडगे, माजी नगरसेविका चंद्रकांत सोनकांबळे, भिमा बोबडे, युवराज दाखले, सुर्यकांत गोफणे, बाळासाहेब वाघमोडे, बजरंग गडदे, लक्ष्मण रुपनर, माणिकराव बारगळ, नागेश तितर, महादेव कवितके, आशा काळे, रुख्मिनी धर्मे सोनताई गडदे, नंदा करे आदी सर्वजण उपस्थित होते.