पिंपरी विधानसभा युवा सेनेच्या वतीने माहिती अधिकार या विषयावर माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. अजित बोराडे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन सत्रा मध्ये माहिती अधिकार कसा अस्तित्वात आला. माहिती साठी अर्ज कसा व कुणाकडे करावा तसेच शुल्क किती इत्यादी विषयांवर अजित बोराडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कु. प्रतीक्षा घुले, निलेश हाके, ओंकार जगदाळे, रवी नगरकर, सनी कड, अजय पिल्ले, प्रमोद गायकवाड, राहुल जाधव, प्रशांत आंब्रे, गोरख मेमाणे, सोन्या लांडे, राज पिसाळ,नंदकुमार देवकर,रोहन धनेधर,गौरव पाटील,राहुल कुंभार,विशाल बोंडे इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते.