मावळ लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये कोणाचा? याच्यावरून गेले सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या रणकंदनामध्ये अलीकडे सेनेच्या कार्यकर्त्यांचाही श्री. बारणे यांना असलेल्या विरोधाने आज कळस गाठला.
आज सेना-भाजपच्या मनोमिलनाची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतल्यानंतर नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीने बारणे विरोधी पत्रके पत्रकारांना वाटल्याने एकच गोंधळ उडाला.
या पत्रकामध्ये बारणेंच्या नेतृत्वावर टिका करण्यात आली असून बारणे कसे खासदारकी लढवण्यासाठी अयोग्य आहे हे लिहिले आहे. दरम्यान, शेवटच्या श्वासापर्यंत बारणे नको या मोहिमेला भाजपबरोबर सेनेमध्येही बळकटी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.